भारताचा आणखी एक शेजारी बांगलादेश आता अस्वस्थ का होतोय? BBC News Marathi

गोष्ट दुनियेची

16-12-2023 • 17 minuti

बांगलादेशाची अर्थव्यवस्था आशिया-पॅसिफिक प्रदेशातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पाश्चिमात्य देशांमधल्या अनेक मोठ्या फॅशन कंपन्यांसाठी बांगलादेश हा मोठा कपडा पुरवठादार आहे. पण सध्या निषेध मोर्चे आणि वाढती महागाई यांमुळे बांगलादेशच्या आर्थिक यशावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. पुढच्या वर्षी जानेवारीत बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. पण त्याआधी पंतप्रधान शेख हसीना यांच्या वर्चस्वाला सामान्य जनता आव्हान देताना दिसते आहे. विरोधी पक्ष म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी अर्थात बीएनपी हसीना यांच्यावर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकते आहे. निवडणुकीआधी तटस्थ अंतरीम सरकार स्थापन झालं नाही, तर निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची त्यांची तयारी आहे. शेख हसीना यांच्यावर लोकशाही कमकुवत करण्याचा आरोप लावला जातो आहे, पण हसीना यांनी तो आरोप नाकारला आहे. त्या हजारो आंदोलकांवर कडक कारवाई करतायत. सरकार आणि विरोधक आपापल्या भूमिकांवर ठाम असल्याचं दिसतंय. बांगलादेशात अशी उलथापालथ का माजते आहे, याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहे आजची गोष्ट दुनियेची.

मूळ पॉडकास्ट - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती - जान्हवी मुळे एडिटिंग - तिलक राज भाटिया