ठळक बातम्या
युनायटेड किंग्डमच्या प्रधानमंत्रीपदी ऋषी सुनक विराजमान /प्रधानमंत्री म्हणून केलेल्या पहिल्या भाषणात देशाला आर्थिक पेचप्रसंगातून बाहेर काढण्याची ग्वाही / प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून सुनक यांचं अभिनंदन
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन /मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी हा टप्पा पुढच्या महिन्यात सुरु करण्याचे संकेत
अनुचित व्यावसायिक व्यवहारांबद्दल गूगलला भारतीय स्पर्धा आयोगाकडून ९३६ कोटी रुपयांचा दंड
फ्रेंच ओपन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची निराशाजनक सुरुवात
आणि
टी २० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर ७ गडी राखून विजय / मार्कस स्टॉयनिसचा टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम