ठळक बातम्या
भाजपाप्रणित केंद्र सरकारची भ्रष्टाचाराविरोधात आघाडी, तिसऱ्या मुदतीत 100 दिवसांतच मोठे निर्णय घेणार पंतप्रधानांचं वक्तव्य.
काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे केवळ बोलाची कढी असल्याची पंतप्रधानांची टीका
देशातल्या लोकशाही आणि राज्यघटनेच्या संरक्षणासाठी काँग्रेसची लढाई,काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा विश्वास.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडून निवडणूक जाहीरनामा सादर.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून दिल्ली आणि हरियाणात अर्भक तस्करीचं जाळं उद्धवस्त, तीन अर्भकांना बचाव.
कझाकिस्तान आंतरराष्ट्रीय बँडमिंटन स्पर्धेत अनुपमा उपाध्याय आणि एम. थरून एकेरीत विजेते.