ठळक बातम्या
भाजपा सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या शंभर दिवसांमध्ये भ्रष्टाचाराविरोधात अधिक मोठे निर्णय घेईल-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन, काँग्रेसचा वचननामा थापांचं गाठोडं असल्याची टीका.
काँग्रेस पक्ष देशातील लोकशाही आणि राज्यघटना वाचवण्यासाठी लढत असल्याचा पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा विश्वास.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाद्वारे निवडणूक वचननामा प्रकाशित.
राज्यात महिला मतदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ.
धाराशिव जिल्ह्यात शासकीय जमिनींची खोटी नोंद केल्याप्रकरणी चोवीस सेवा केंद्रचालकांच्या विरोधात गुन्हा दाखल.
कझाकस्तान आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे अनुपमा उपाध्याय आणि एम तरुण अजिंक्य.